बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू”

जळगाव | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातही राजकारण रंगालया सुरूवात झाली. पाच पैकी चार राज्यात भाजपने (BJP) मुसंडी मारली तर शिवसेनेचा (Shivsena) मात्र फ्लॉप शो पाहायला मिळाला. यावरून राज्यात टीकेचं राजकारण पाहायला मिळत आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गोवा विधानसभा निवडणुकीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. यानंतर फडणवीसांचं कौतुक करताना भाजप आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. फडणवीस सर्वांना पुरून उरतील. असे अनेक ठाकरे आणि पवार ते खिशात घेऊन फिरतात, अशी टीका नितेश राणेंनी केली होती.

नितेश राणेंच्या या टीकेला शिवसेना नेते व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणे कोण आहेत?, असा प्रश्न विचारत गुलाबराव पाटलांनी नितेश राणेंवर टीका केली आहे. हे नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू आहे. ते काय आम्हाला शिकवणार, असा घणाघात गुलाबराव पाटलांनी केला.

दरम्यान, शिवसेना विरूद्ध राणे कुटंबियांच्या वादात आणखी भर पडली आहेत. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या टीकेला नितेश राणे (Nitesh Rane) काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

गरोदर महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

सोनिया गांधी आणि राहुल गांधी राजीनामा देणार?, काँग्रेसने स्पष्टच सांगितलं…

पोस्टाच्या ‘या’ योजनेबद्दल ऐकलंय का?, फक्त 95 रूपयात लाखोंचा फायदा होणार

“परमेश्वरानं मला दूरदृष्टी दिली अन् मी भाजपमध्ये आलो”

मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीसांना नोटीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More