Uddhav Thackeray l मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख आणि ठिकाण ठरल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी काळ दिली आहे. यानुसार आता 5 डिसेंबरला नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अशातच आज संध्याकाळी मुंबईमध्ये महायुतीची बैठक होणार आहे. मात्र त्यानंतर अनेक गोष्टी समोर येणार आहेत. परंतु, आता शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी एक खळबळ वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात :
गुलाबराव पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार फुटणार असल्याचा दावा केला आहे. कारण आदित्य ठाकरे हा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे. कारण आंदोलन करून आज आम्ही त्यांना मोठं केलं आहे, अन्यथा आज ज्यांनी शिवसेनेला मोठे केले ते लोक कुठे आहेत, हे संजय राऊत यांना विचारा असा टोला त्यांनी लगावला आहे.
यावेळी ते म्हणले की, दिवाकर रावते कुठे आहेत, लीलाधर ढाके कुठे आहेत. तसेच महाडिकांच नाव कधी घेतलं जातं नाही. या सर्वांना उद्धव ठाकरे विसरले आहेत. तसेच त्या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक वीट असल्याचं ते म्हणाले आहेत. परंतु या सर्वांना विसरले म्हणून उद्धव ठाकरे हे संजय राऊत सारखा एक दगड घेऊन आले असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
Uddhav Thackeray l मुख्यमंत्री शपथ ग्रहण कधी करणार? :
यासंदर्भात गुलाबराव पाटील माहिती देताना म्हणाले की, मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांना विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की कुठली अडचण होईल अशा पद्धतीचा भाकीत मी करणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा जो निर्णय घेतील त्या निर्णयाला माझा 100% पाठिंबा असणार आहे.
अशातच आता महायुती सरकारचा शपथविधी हा 5 डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र उद्या 2 डिसेंबर रोजी भाजपच्या गटनेत्याची निवड होणार आहे. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शपथ ग्रहण करणार असल्याचा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
News Title : Gulabrao Patil On Udhav Thackeray Shivsena
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वसामान्यांना महागाईचा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी महागला
महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर! कोणाला लागणार लॉटरी?
“नकोच ते राजकारण”; दिलीप वळसे पाटलांच्या मुलीची पोस्ट चर्चेत
मुंबई व ठाण्यात ‘इतके’ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!