बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही”

जळगाव | धनंजय मुंडेंनी स्वतः जाहीरपणे आपल्या दुसऱ्या कुटुंबाची कबुली दिली आहे. मात्र, तरीही विरोधकांकडून या प्रकरणी राजकारण केले जात आहे. मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही, अशा शब्दांत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला सुनावलं आहे.

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आज सकाळी कोरोना लसीकरणाला गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते.

धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत, असं मला वाटतं. मुंडे आपलं निर्दोषत्व लवकरच सिद्ध करतील, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.

धनंजय मुंडे यांनी जनतेसमोर स्वतः कबुली दिली आहे. एखादा माणूस अशी कबुली देत असेल तरीही तुम्ही त्याला चोर ठरवणार काय? त्यांना काही लपवायचं असतं तर त्यांनी जाहीरपणे कबुली दिलीच नसती. अशा पद्धतीने राजकारण करून एखाद्याची 30 वर्षांची तपश्चर्या उद्ध्वस्त करू, असं जर कुणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

‘पंतप्रधान मोदी यांचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही’; राज्यातील काँग्रेसच्या या एकमेव खासदाराचं मोदींना चॅलेंज!

‘देशाचे पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झाले आहेत’; थोरातांची नरेंद्र मोदींवर टीका

धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंनी सोडलं मौन; म्हणाल्या…

त्या माझा आदर करतात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, पण आदर दुरूनच करा- कृष्णा हेगडे

लस घेतली म्हणजे आता सर्व काही संपलं असं नाही- उद्धव ठाकरे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More