जळगाव | राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आमच्याशी ‘लव्ह मॅरेज’ केलं असतं, राज्यात सरकार स्थापनेवेळी एक पाऊल पुढे टाकलं असतं तर आज राज्यात युतीचीच सत्ता राहिली असती, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना लगावला आहे.
महापालिकेच्या वतीने आज दुपारी केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन आले होते. यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते.
गिरीश महाजन यांनी महापालिकेत कशी सत्ता आणली, हे मला चांगले माहिती आहे. त्यांनी जी रसद पुरवून सत्ता आणली ती रसद आमच्याकडे नव्हती, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.
दरम्यान, सत्ता आपली आहे, काल तुमची सत्ता होती. उद्या आमची सत्ता असेल, काही सांगता येत नाही. उद्या-परवा आपली सत्ता असेल. आज तर मला याठिकाणी युतीची सत्ता आहे, असेच वाटतेय. भविष्यात काय घडेल, हे सांगता येत नसल्याचं गिरीश महाजन म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
लस घेतल्यानंतरही उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण!
…तर मी माझी खासदारकी फेकून देतो- खासदार संभाजीराजे
बाबो! एक थाळी संपवा अन् मिळवा एक तोळ सोनं, जाणून घ्या ही भन्नाट ऑफर
महाराष्ट्रसह देशातील ‘या’ राज्यातही कोरोनारूग्णांचा वाढला आकडा
इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दिली ‘या’ तीन चेहऱ्यांना संधी