‘आम्हाला डुकरं म्हणतात आणि आमच्याच मतांवर राज्यसभेत निवडून जातात’,गुलाबराव पाटलांची फटकेबाजी
मुंबई | विधानभवनात दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुरु आहे. आज आणि काल दोन मुख्य प्रस्ताव संमत करण्यात आले. काल (3 जुलै) रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यात भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतांनी विजयी झाले. तर आज (4 जुलै) रोजी बहुमत चाचणीत भाजप आणि शिंदे गटाच्या संयुक्त आघाडीने 164 मते मिळवत सत्तेवर शिक्कामोर्तब केला.
आज विश्वासदर्शक प्रस्तावाच्या अभिनंदन प्रस्तावावर अनेक नेत्यांनी भाषण केले. त्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी देखील बरेच मोठे भाषण दिले. त्यात त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. तसेच बंडखोर आमदारांची बाजू देखील त्यांनी दमदारपने लाऊन धरली.
पाटील म्हणाले, आम्ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली या गोष्टीची आम्हाला कायम सल राहिल. परंतु उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या चार लोकांच्या कोंडाळ्याने त्यांना बावळट ठरविले आहे. ज्यांची निवडूण येण्याची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात, आमच्या मतावर खासदार होतात अश्या शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. आम्हाला डुकरे आणि घाण बोलतात आणि आमच्याच मतांवर राज्यसभेत निवडून जातात असा घाणाघात पाटलांनी केला.
दरम्यान, आदित्य ठाकरे हे आम्हाला घाण म्हणतात. आदित्य ठाकरे महाराष्ट्र फिरले नाहीत. आदित्य साहेब मंत्री होते, ते महाराष्ट्रात फिरु शकले नाहीत. एकटे एकनाथ शिंदे महाराष्ट्रात फिरले. जळगाव ते पाचवेळा आले. शरद पवार राज्यात फिरतात, अजितदादा फिरतात, पण आमचे नेते का आले नाहीत? आमचे हे दु:ख सर्वांना समजले असेल की का गेलो? अशा शब्दात गुलाबरावांनी आपली बाजू मांडली.
थोडक्यात बातम्या –
लोकल प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता लवकरच ‘ही’ सुविधा मिळणार
पाणी कपातीमुळे वाढणार डेंग्यूचा ताप, वाचा सविस्तर
मोठी बातमी! विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार
“ताकद कमी झाली तरी महाराष्ट्रात आणि जनतेच्या मनात आम्हीच”
“शरद पवार बोलतात त्याच्या नेहमी उलट होतं, त्यामुळे…”
Comments are closed.