Maharashtra l विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील नागरिकांना अनेक आश्वासन दिली जात आहेत. अशातच आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील महिलांना एक आश्वासन दिल आहे. तर पुन्हा आमची सत्ता आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसै वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे.
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर आरोप :
गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर देखील आरोप केला आहे. महिलांना पगार मिळू नये तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू नयेत म्हणून राष्ट्रवादीवाले काँग्रेसवाले कोर्टात गेले आहेत. परंतु आम्ही ठरवलं आहे. आमचं सरकार पुन्हा आलं तर राज्यातील लाडक्या बहिणींना आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत.
याशिवाय आमचं सरकार आलं नाही तर विरोधक हे पगार देखील बंद करणार आहे हे राज्यातील बहिणींना माहित आहे असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. तसेच लाडक्या बहिणींसंदर्भात गुलाबराव पाटील म्हणाले की, कडकी असलेल्या बहिणीला पैसे देऊन आम्ही मडके डोक्यावर ठेवायला लागले. तसेच पैसे दिले म्हणून काहीतरी महिला बाजारातून आणायला देखील लागल्या आहेत.
Maharashtra l लाडक्या बहिणी विधानसभेला विरोधकांना आडव करणार? :
मात्र ही काही साधी आणि सोपी गोष्ट आहे का? आयुष्यात आजपर्यंत कोणाला जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं आहे. त्यामुळे बोलायचा भात आणि बोलायची कढी झालेली दिसत आहे. तर आता या लाडक्या बहिणी विधानसभेला त्यांना आडव करणार आहेत असं गुलाबराव पाटील म्हणले आहेत.
तसेच विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून येणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. कारण मी निवडणुकीमध्ये कोणाला कमी लेखत नाही. त्यामुळे मला जनतेवर विश्वास आहे असं पाटील म्हणाले आहेत.
News Title : Gulabrao patil statement on ladki bahin yojna
महत्वाच्या बातम्या-
लॉरेन्स बिश्नोईच्या प्रेमाचा भयानक अंत, गर्लफ्रेंडमुळे बनला गँगस्टर
मी जे बोलतो ते करतो…; मराठा समाजाला मी स्वत: आरक्षण देणार
मोदी सरकारकडून कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट!
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज, दिवाळी गोड होणार
एआर रहमानचा साऊंड असलेल्या महिंद्राच्या ”या’ भन्नाट कारची फीचर्स जाणून घ्या!