“आम्ही पवारांना नेहमी घाबरुन असतो कारण…”

जळगाव | आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण तुम्ही सकाळी-सकाळी शपथ घेता आणि काय करुन टाकता ते आम्हाला माहिती नाही. त्यामुळे पवारांना कायम बरोबर ठेवावे लागते. कारण पवारांची बुद्धी चालते तशी कोणचीही चालत नाही, असं राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटलं आहे.

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील एका विवाह सोहळ्यात गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.

वधू ही पवार नाव असलेल्या कुटुंबातील असल्याने गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणावेळी राजकीय फटेकबाजी करुन कार्यक्रमाला एकच रंगत आणली.

राजकारणाचा आणि विरोधाचा भाग सोडा पण हा लग्न सोहळा आहे. हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही. व्यक्तीच्या घरातला कार्यक्रम आहे. माणुसकीतला हा सोहळा आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप आशीर्वाद देतो, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-