जळगाव महाराष्ट्र

“देवेंद्र फडणवीसांनी खडसेंच्या रुपात एक ओबीसी नेता संपवला”

जळगाव | देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या रुपाने एक ओबीसी नेता संपवला, असं सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.

एकनाथराव खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील युद्ध असंच चालतं, पण पुन्हा बंद पडते. हे युद्ध कायम चालत राहिलं पाहिजे, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

कोणतीही गोष्ट हातात घेतली म्हणजे ती धसास लावली पाहिजे. आता खडसेंनी पूर्ण युद्ध लढायला हवे. बोलायचे. आणि पुन्हा बंद करायचे, हे माझ्या स्वभावात बसत नाही. खडसेंनी आता आरपारची लढाई लढली पाहिजे, असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्त्व राहणार नाही. युद्ध आणि कुस्ती कधीही अपूर्ण खेळायची नसते, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

‘बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात’; शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

“मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अनाकलनीय”

व्यंगचित्रावरुन आता शिरुरमध्येही राजकारण तापलं; शिवसेना-राष्ट्रवादीत स्टेटस वॉर सुरु!

“देवासारख्या नेतृत्वावर कोण टीका करत असेल तर सहन करणार नाही”

नागपूरात आता मास्क न वापरल्यास भरावा लागणार इतका दंड!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या