बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर भर चौकात गिरीश महाजनांचा सत्कार करेल”; गुलाबराव पाटलांचं महाजनांना आव्हान

जळगाव | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीष महाजन यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर महाजन यांनी दिलेल्या यांनीही खडसेंवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारमधील शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाजनांना लसीबाबत एक आव्हान केलं आहे.

गिरीश भाऊंना माझा सल्ला आहे. पश्चिम बंगालमध्ये अमित शहा यांनी गिरीशभाऊंना स्टेजवर बोलावलं होतं. जर त्यांचा काही प्रभाव पडला असेल तर जास्तीत जास्त लस जळगावसाठी आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी आणावी, असं आव्हान गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजनांना केलं आहे.

गिरीश महाजन यांनी आवश्यक तो लसीचा साठा महाराष्ट्रासाठी मिळवून दिला, तर त्यांचा मी भर चौकामध्ये सत्कार करेल, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच लसी पूर्ण उपलब्ध असल्या तर महाराष्ट्र सरकारची आरोग्य यंत्रणा एवढी सज्ज आहे की दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण राज्याला लसीकरण करू शकते. पण जोपर्यंत लसीकरणाचा कोटा आपल्याकडे येत नाही तोपर्यंत इथे परमेश्वर जरी आला, तरी लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, गुलाबराव पाटलांच्या या आव्हानावर गिरीष महाजन काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लसीकरणावरून राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान असलेलं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

विनाकारण घराबाहेर फिरत होत्या मुली, पोलिसांनी अशी घडवली अद्दल, पाहा व्हिडीओ-

न्यूज इंडस्ट्रीला मोठा धक्का! रोहित सरदाना यांच्यानंतर लोकप्रिय महिला ॲंकरचं निधन

बिहारचा बाहुबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद शहाबुद्दीनचं कोरोनाने निधन

लेक असावी तर अशी!, भारतीय संघातील ‘या’ खेळाडूच्या प्रेयसीकडून वडिलांना यकृत दान

मराठी पाऊल पडते पुढे… आदिवासी तरुणाच्या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More