बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नासक्या भाजीची उपमा देत गुलाबराव पाटील संजय राऊतांवर बरसले, म्हणाले…

जळगाव | शिवसेना आमदारांचा मोठा गट एकनाथ शिंदेंसोबत फुटल्याने शिवसेनेला मोठं भगदाड पडलं. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाराजीचा सूर आवळला. शिंदे सरकार आता सत्तेत आलं असलं तरी संजय राऊत विरूद्ध शिंदे गटातील बंडखोर आमदार असं शाब्दिक युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे.

पक्षप्रमुखांवर आमची नाराजी नसल्याचं सांगताना अनेक बंडखोर आमदारांनी संजय राऊतांवर थेट निशाणा साधला. त्यात आता शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना नासक्या भाजीची उपमा देत खोचक शब्दात टीका केली आहे.

आम्ही बंडखोर नाहीच. आम्ही शिवसेनेत आहोत पण नासक्या भाजीबद्दल काही बोलणार नाही, अशी बोचरी टीका गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना उद्देशून केली आहे. जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना धारेवर धरलं आहे.

दरम्यान, आमच्या पक्षाचा सत्यानाश केला तो शुक्राचार्य कोण आहे ते तुम्हाला माहितीच, अशी टीका करताना आम्ही तोच पक्ष वाचवत असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. तर आम्ही उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंचा आदर करत असल्याचं देखील गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी!

“माझ्या सारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की शिवसेना संपायला हवी”

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा झटका!

शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका; घेतला मोठा निर्णय

‘शरद पवारांचं कौतुक नाही करायचं तर कोणाचं करायचं?’; राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More