बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंना बावरट करणारे ‘ते’ चार जण कोण?, गुलाबरावांचा रोख कुणाकडे???

मुंबई | बहुमत चाचणीत विजय मिळवल्यानंतर शिंदे सरकार काल अधिकृतपणे सत्तेत आलं. विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्यानंतर अनेकांनी अभिनंदन प्रस्ताव सादर केला. तर बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी यावेळी तुफान फटकेबाजी केली. मनातील खदखद व्यक्त करताना चार लोकांच्या कोंडाळ्यानं आमच्या उद्धव साहेबांना बावरट केलं, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी भर विधानसभेत केलं.

गुलाबरावांनी उल्लेख केलेले ते चार जण कोण अशा चर्चा रंगायला सुरूवात झाली. गुलाबराव पाटलांनी त्यांच्या भाषणात आदित्य ठाकरे व संजय राऊतांवर जाहीर टीका केली. मात्र, त्यांचा रोख हा आमदारांच्या मतांवर निवडून आलेल्या खासदारांकडे जास्त होता. त्यामुळे त्या चार जणात संजय राऊत व अनिल देसाईंचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.

पक्षाचे महत्त्वाचे निर्णय घेताना आणि मातोश्रीवर देखील अनिल परबांना विशेष महत्त्व दिलं जात आहे. त्यामुळे गुलाबरावांच्या यादीत अनिल परबांच्या नावाचा देखील समावेश असू शकतो. तसेच गुलाबरावांच्या त्या चार जणांच्या यादीत मिलींद नार्वेकर यांच्या नावाचा समावेश असल्याची देखील चर्चा आहे.

दरम्यान, गुलाबराव पाटलांनी विधानसभेत बोलताना उद्धव ठाकरेंना आजूबाजूचे कोंडाळे दूर करण्याची विनंती केली आहे. तर तुम्हाला पट्टी बांधून जे धृतराष्ट्रासारखे सांगत आहेत त्यांना लांब करा, असा सल्ला देखील गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘ज्या चार लोकांच्या नावानं बोटं मोडता, त्या चार लोकांंमुळेच…’, संजय राऊत कडाडले

‘शरद पवार म्हणजे काही…’, केतकी चितळे स्पष्टच बोलली

‘एखाद्या सांगाड्यासारखं हे सरकार भाजपच्या रुग्णवाहिकेतून अवतरलं आहे’, शिवसेनेचा घणाघात

‘हिंमत असेल तर…’, उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला आव्हान

तुमच्याकडे असणाऱ्या ‘या’ नोटा बाद होणार, RBI चा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More