बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा, पण…’; गुलाबराव पाटील यांचं आवाहन

जळगाव | कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या धान्यासाठी चाळण व प्रतवारी यंत्रणा उभारली आहे. या प्रकल्पाचे माजी खासदार तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे असं नामकरण करण्यात आलं. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना पाणीपुरवाठामंत्री गुलाबराव पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.

ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा, असं वक्तव्य पाणीपुरवाठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. तसेच ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा. मात्र विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहनही गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

आज कोणीही मी एका पक्षाचा आहे असे सांगू शकत नाही. सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करून आमदार झाले आहेत. भाजपत तब्बल दोन डझन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बाहेरचे लोक आमदार आहेत, असं गुलाबराव पाटील यांनी यांनी म्हटलंय.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. यावेळी खासदार रक्षा खडसे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजू भोळे तसेच भाजप व शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 96 टक्क्यांवर

राज्यात आज विक्रमी लसीकरणाची नोंद! तब्बल ‘एवढ्या’ नागरिकांनी घेतली लस

शेतकऱ्यांची पुढील लढाई केव्हा आणि कुठे होईल? राकेश टिकैत म्हणाले…

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 18 कोरोनाबाधितांची नोंद

मोठी बातमी! ‘या’ राज्यात 5 जुलैपर्यंत नाईट कर्फ्यू, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More