बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लेकीनेही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवावी’; गुलाबराव पाटलांचं रक्षा खडसेंना प्रत्युत्तर

जळगाव | केळी पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात श्रेय घेण्यावरुन वाद सुरु झाला आहे. मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपच्या जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात वाक् युद्ध रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं, असा टोला भाजप खासदार रक्षा खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटलांना लगावला होता. याला आता गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

रक्षा खडसेंना मी वडिलांसारखा आहे तर आता लेकीनेही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवली पाहिजे. लेक आहे तर लेक आहेच. लेकीने बापाच्या कामाचा विचार करावा आणि लेकीने बापाच्या हद्दीत राहावं, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हवामानावर आधारित फळपीक विम्याचे निकष राज्य शासनाने बदलले. पण भाजप खासदार रक्षा खडसे या केंद्राने निकष बदलल्याचा खोटा दावा करीत आहेत. कुठे लग्न दिसले की आपला बाजा घेऊन त्या ठिकाणी वाजविण्यास त्या हजर होतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यानंतर रक्षा खडसे यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला होता.

थोडक्यात बातम्या- 

मन सुन्न करणारी घटना! भावाच्या निधनाचं वृत्त कळताच छोट्या भावानेही जीव सोडला, अन्…

मी छत्रपती घराण्याचा वारस आहे, कसा मॅनेज होईन?- खासदार संभाजीराजे

पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद नाही- जयंत पाटील

“लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचं नाव घेऊन मी पुन्हा येईनचं सोंग करतंय”

महाराष्ट्रात कोळीच्या दोन नवीन प्रजातींचा शोध; कोळ्याच्या प्रजातींना शहीद तुकाराम ओंबळेंचं नाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More