बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालते, शिवसैनिक भगिनीवर वार करणार नाहीत”

जळगाव | शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडून शिवसेना भवन येथे विरोध प्रदर्शन करण्यात आलं. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथं जमले. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं चित्र दिसून आलं. यावेळी गोंधळ उडाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आलीय. तर महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजप नेत्यांनी महिला कार्यकर्त्यांसह इतर कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या शिवसैनिकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. तसेच यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. याला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंची जाहीर सभा असते, तेव्हा स्त्रीला सन्मान दिला जातो, असं गुलाबराव पाटील म्हणाले

शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहे. त्यामुळे चित्रा वाघांनी सर्कशीतल्या वाघासारखं ज्या लोकांच्यामुळं टीका केली आहे, त्या भगिनीला माझी विनंती आहे. कोणत्याही भगिनीवर शिवसैनिक वार करणार नाहीत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचं कोरोनाने निधन!

आनंदाची बातमी! राज्याचा रिकव्हरी रेट वाढला, वाचा आजची आकडेवारी

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

मोठी बातमी! पुण्यात पुन्हा लॉकडाऊन, महापौरांनी ट्विट करत दिली माहिती

‘शरीरसुखासाठी माझ्यावर जबरदस्ती केली होती’; ‘तारक मेहता’ फेम ‘या’ अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्फोट

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More