बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील शिवसेना सहसंपर्क गुलाबराव वाघ यांना मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएचा धमकीचा फोन आल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

गुलाबराव वाघ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आपण या धमक्यांना भीक घालणाेर नसल्याचं ते म्हणाले. बंडखोराच्या विरोधात शिवसैनिक एकवटला आहे. ही एकजूट यापुढेही अशीच कायम राहील, असं गुलाबराव वाघ यांनी सांगितलं.

दरम्यान मिळालेली माहिती अशी की, जळगाव येथे बंडखोर आमदारांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सहभागी होत असताना आमदारांचा विरोध का करताय? विरोध केला तर आम्ही तुम्हाला ठार मारु, अशी धमकी दिली. आपण एकनाथ शिंदेचे पीए बोलत आहोत असं त्या व़्यक्तीने सांगितलं असल्याचं गुलाबराव वाघ म्हणाले.

हा नंबर पोलिस अधिक्षकांना देत तक्रार करणार असल्याचं सांगितलं. या पार्श्वभूमीवर सेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत म्हणाले, “आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला हात लावला तर आम्ही एकालाही सोडणार नाही”

थोडक्यात बातम्या

बंडखोर आमदारांबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“एकनाथ शिंदे मुळ शिवसेनेवर दावा करु शकत नाहीत”

मोठी बातमी! शिवसेनेतून आणखी एका बड्या नेत्याची हकालपट्टी

राज्यातील नवीन सरकारबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

“तीन दशकातील मराठी रंगभूमीला व्यामीश्र संघर्षाची पार्श्वभूमी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More