औरंगाबाद महाराष्ट्र

“आमच्याकडचे रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आणि तुमच्याकडचे…”

जालना | आमच्याकडचे रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आणि तुमच्याकडचे रस्ते ओम पुरींच्या गालासारखे खडबडीत, असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. 

शनिवारी घनसावंगी येथे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त हॉलिबॉल आणि क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा जळगाव जिल्ह्याच्या रस्त्यांची मराठवाड्याच्या रस्त्यांशी तुलना करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं.

तुमचे आमदार राजेश टोपे पंधरा वर्षे मंत्री होते, ते शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसायचे तरीही त्यांना तालुक्यातील रस्त्यांची कामे करता आली नाहीत का?, असा सवाल त्यावेळी गुलाबरावांनी उपस्थित केला.

दरम्यान, भाजपशी चांगले संबंध असते तर आपला जिल्हा विकासकामात आणखी पुढे गेला असता, असा दावाही त्यावेळी गुलाबरावांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

“मैदान मारायच्या बाता करताय आणि शुन्यावर बाद होताय”

-पुण्यातून निवडणूक लढायची आहे मग पाच कोटी खर्च करण्याची तयारी ठेवा- अशोक चव्हाण

सरफराज अहमदला 4 सामने खेळण्यास बंदी, वर्णद्वेषी केलेलं वक्तव्यं आलं अंगलट

-अमित ठाकरेंच्या लग्नाचं मला निमंत्रणच नव्हतं, जाणकरांची नाराजी

-पहिल्यांदाच मिशी कापली होती, तेही फक्त बाळासाहेबांसाठी- प्रविण तरडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या