बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसला पंतप्रधानपद नाही दिलं तरी चालेल; भाजपला सत्तेपासून रोखणे हाच मुख्य उद्देश- काँग्रेस

नवी दिल्ली |  केंद्रात भाजप किंवा इनडीएला सरकार स्थापनेपासून रोखायचं हाच आमचा मुख्य उद्देश आहे. भले मग काँग्रेसला पंतप्रधानपद नाही मिळालं तरी चालेल, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे.

सर्वसहमती असेल तर काँग्रेसचा पंतप्रधान होऊ शकतो. त्यामुळे एकमताने ज्या नेत्याची पंतप्रधानपदासाठी निवड होईल त्याला आमचा पाठिंबा असेल, असं आझाद यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणूक ही कधीच पंतप्रधानपदाच्या दोन उमेदवारांमध्ये नसते तर ती पक्ष आणि विचारधारांमधील असते, असंही ते म्हणाले.

देशातल्या जनतेने कोणताही एक नेता निवडायचा नसतो तर विचारधारेची निवड करायची असते, असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

महत्वाच्या बातम्या

-माझी बायको कधीही खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धूंचा पत्नीला पाठिंबा

-…बरं झालं भाजप मला देशभक्त मानत नाही- कन्हैया कुमार

-कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरेंना आघाडीत येऊ देणार नाही- संजय निरुपम

-‘द वायर’ला राहुल गांधींची खास मुलाखत… काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करेल?? राहुल म्हणतात…

-हे सरकार अटींचे आहे, कोणतही काम नाही; दुष्काळाच्या मुद्द्यावरून अजित पवारांची टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More