बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझ्या व्यवसायावर लाथ मारू नकोस- गुलशन ग्रोवर

मुंबई | बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे ‘बॅड मॅन’ म्हणून गुलशन ग्रोवर यांना ओळखलं जातं. त्यांच्या चित्रपटातील विविध डॉयलॉगमुळे ते प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरसुदधा मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेले पाहायला मिळतात. अलिकडेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे नव्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेतही आहेत. याचाच धागा पकडत गुलशान ग्रोवर यांनी एक भन्नाट ट्विट केलं आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे काही फोटो असलेले एक ट्विट सोशल मडियावर पोस्ट केले आहेत. त्याच्या नवीन हेअरस्टाईलच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. धोनीच्या नवीन लुकचे फोटो प्रसिद्ध हेअरस्टाईलिस्ट अलीम हकीमने शेअर केला आहे. यामध्ये धोनी डॅशिंग वेगळ्याच अंदाजामध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे.

गुलशान ग्रोवर फोटो शेअर करत म्हणाले की, माही हा तुझा लुक छान आहे. तुला खलनायकाची भूमिका आली तर ती स्वीकारू नकोस, माझ्या व्यवसायाला लाथ मारू नकोस. कारण ती भूमिका अभिनेता संजय दत्त, सुनिल शेट्टी आणि जॉकी श्रॉफ हे माझेच तीन भाऊ करत आहेत. तेव्हा तुझ्या लुककडे पाहून मला असं वाटतं की, मला खलनायकाची भूमिका मिळणार नाही. अलीम हाकिम तुझ्या कडे ‘बॅड मॅन’ येत आहे, असं म्हणत गुलशान ग्रोवर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनीही धोनीच्या नव्या लुकवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यासोबतच ग्रोवर यांनी केलेल्या ट्विटवरही त्यांच्या चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“भगतसिंह कोश्यारींना समजायला हवं ते मुख्यमंत्री नसून राज्यपाल आहेत”

विरोधी पक्षातील 100 खासदारांच्या बैठकीतील संजय राऊतांचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाले…

“सोनू सूदची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?”

मोठी बातमी! अमित शहा आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट होणार

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! संकेतस्थळावर लोड येऊ नये म्हणून 4 नव्या वेबसाईट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More