नवी दिल्ली | सध्या देशात सुरु असलेला हिंसाचार पाहून दु:ख वाटतं, असं वक्तव्य प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी केलं आहे. ते साहित्य अकादमी पुरस्कार कार्यक्रमात बोलत होते. सध्या देशात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यांवरुन देशात अशांतता आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. याच मुद्द्यांवरुन दिल्लीत दंगली उसळल्या होत्या. ज्यात 40 पेक्षा अधिक लोकांनी आपला जीव गमावला होता.
दिल्लीतील शाहीन बाग येथे गेल्या अनेक दिवसांपासून सीएए विरोधात महिलांचं आंदोलन सुरु आहे. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतभेटीवर आल्यानंतर दिल्लीत हिंसाचार उसळला होता.
सध्या देशात सुरु असलेल्या गदारोळावर गुलजार यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या देशात जे काही सुरु आहे ते चुकीचं आहे. देशात सुरु असलेला हिंसाचार पाहून मनाला दु:ख वाटतं, असं ते म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
“आम्ही सरड्यासारखे रंग बदलत नाही”
कलयुगात महाभारत आणि रामायण एकत्र बघायचा योग आला- निलेश राणे
महत्वाच्या बातम्या-
भारतात मुस्लिमांच्या जीवाला धोका- अयातुल्ला खामेनी
आमचं रक्त खवळलं म्हणून बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली- संजय राऊत
ऐस बँकेच्या खातेदारांना दिलासा; स्टेट बँक खरेदी करणार मोठा हिस्सा
Comments are closed.