बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीने शरद पवारांवर केलेल्या आरोपाने खळबळ

मुंबई | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दगडफेक, चप्पलफेक करत आंदोलन केलं. शरद पवारांच्या घराबाहेरील हिंसक आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना गावदेवी पोलिसांनी अटक केली.

गुणरत्न सदावर्तेंच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Patil) यांनी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आम्ही पवार कुटुंबियांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केल्याने आमच्यावर दबाव टाकण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं जयश्री पाटील म्हणाल्या.

माझ्या पतीच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर त्यासाठी शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील जबाबदार असतील. या तिघांकडून माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, कसलीही माहिती न देता त्यांना अटक करण्यात आली. अतिरेकी असल्यासारखं त्यांना घरातून घेऊन गेले. मला त्यांना भेटूही देत नाही. शरद पवार यांचं हे षडयंत्र आहे. ते ताकदीचा चुकीचा वापर करत आहेत, असा घणाघाती आरोप देखील सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात”

18 वर्षांवरील व्यक्तींनाही मिळणार बूस्टर डोस, मोजावे लागणार ‘इतके’ रूपये

पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त 100 रूपयांपासून करू शकता गुंतवणूक

‘अस्वस्थ, अशांत, अतृप्त आत्मे’, शरद पवारांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

कार्डशिवायही काढता येणार एटीएममधून पैसे, आरबीआयने केली मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More