बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकारचा निर्णय मान्य आहे का?, सदाभाऊ आणि पडळकरांची फसवणूक झाली”

मुंबई | लालपरीचा संप संपण्यासाठी सरकारकडून पगार वाढीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. पगार वाढीवरून सध्या राज्यातील वातावरण जोरदार पेटलं आहे. प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका (Gunaratna Sadavarte strongly criticizes the state government) करताना सरकारनं कर्मचाऱ्यांसोबत अन्याय केल्याची भावना व्यक्त केली आहे.

मागील 15 दिवसांपासून संप करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची प्रमुख मागणी मांडली होती. पण सरकारनं न्यायालयाच्या समितीचा हवाला देताना समितीचा अहवाल येईपर्यंत आपण विलीनीकरण करू शकत नसल्याचं म्हटलं आहे. यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पत्रकारांनी सरकारचा निर्णय मान्य आहे का? सदाभाऊ आणि खोत यांची फसवणूक झाली आहे. आजची रात्र आम्ही आझाद मैदानावरच घालवणार आहे. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याशी चर्चा करुन आंदोलनाची पुढील दिशा सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जाहीर करु, असंही सदावर्ते म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना फसवलं आहे. सरकारसोबत मिळून शरद पवार यांनी एसटीच्या विलीनीकरणाचा प्रश्न मिटवायला हवा होता, असं सदावर्ते म्हणले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं उच्च न्यायालयात सदावर्ते हे बाजू मांडत आहेत. परिणामी सध्या गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या 

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल?, ‘या’ दोन नावांची चर्चा

“राज्यातील रस्ते कतरिनाच्या गालासारखे गुळगुळीत असावेत”; राज्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

“मी डंके की चोटपर सांगतोय, शरद पवारांनी विश्वासघात केला”

भारी काम झालं! रेशनधारक कुटुंबांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

भर पत्रकार परिषदेत अनिल परब यांचा पडळकरांना टोला, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More