बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुरूंगातून बाहेर येताच गुणरत्न सदावर्तेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने हिंसक आंदोलन केलं. या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे सूत्रधार म्हणून वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

गुणरत्न सदावर्तेंची तब्बल 18 दिवसानंतर कारागृहातून सुटका झाली आहे. आर्थर रोड कारागृहातून सुटल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सत्य परेशान हो सकता है, पराभूत नहीं. मुश्किलो के आगे जीत होती है, अशी प्रतिक्रिया सदावर्तेंनी दिली.

याद करो वो दिन. जेव्हा तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणली होती. माझ्याही केसमध्ये तेच झालं. इंदिराजींची आणीबाणी आणि आताचा काळ हा सेमच वाटतोय, असा घणाघात गुणरत्न सदावर्तेंनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून (CM Uddhav Thackeray) आणीबाणीसारखी वागणूक अपेक्षित नाही, असं वक्तव्य गुणरत्न सदावर्तेंनी केलं आहे. तर आमच्यावर जी परिस्थिती आली त्याला आम्ही समोरे गेलो. आम्ही निष्ठेने कष्टकऱ्यांसाठी काम करतो, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय अहवालातून ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

कोरोनानंतर बर्ड फ्लूचं सावट; ‘या’ ठिकाणी माणसामध्येही आढळला H3N8 स्ट्रेन

“आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती खोटेपणा कराल?”

छगन भुजबळांना ईडीचा मोठा दिलासा, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुढील 2 दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More