बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्याला ‘इतक्या’ लाखांचं बक्षिस”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना भडकावल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (गुणरत्न सदावर्ते)यांना अटकही करण्यात आली आहे. आता याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या निषेधार्थ आज बारामतीत एमआयडीसी व टेक्स्टाइल पार्कच्या महिलांनी आंदोलन केले. यावेळी कामगार नेते तुकाराम चौधरी यांनी खळबळजनक वक्तव्य केले. सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले.

शरद पवारांच्या हल्ल्यामागे वकील गुणरत्न सदावर्ते यांचाच हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची जीभ हासडणाऱ्यास रोख 11 लाख तर त्यांच्या हातात बांगड्या भरणाऱ्या महिलेला 5 लाख रुपये आणि तोंडाला काळे फासणाऱ्या 51 हजारांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, कामगारांमध्ये हस्तक्षेप करुन एसटी कर्मचार्‍यांच्या भावना भडकवून भाषणे केलीत. तसेच आक्षेपार्ह वक्तव्य करुन संकट निर्माण केले. तसेच आमचे नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीत 12 तारखेला येऊन बारा वाजता मोर्चा काढू, असा इशारा देण्यात आला  होता.

थोडक्यात बातम्या – 

Raj Thackeray | ‘3 तारखेनंतर भोंगे हटवले नाहीत तर…’; राज ठाकरेंचा इशारा

पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा

धक्कादायक ! भर उन्हात लग्नात डान्स केल्यानं तरुणाचा मृत्यू

18 ते 20 एप्रिल दरम्यान ‘या’ भागात उष्णतेचा कहर, वाचा हवामान खात्याचा इशारा

100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांची सारवासारव, म्हणाले…

मोठी बातमी ! लोटे एमआयडी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More