बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अनिल परबांची तेवढी ताकद नाही, मंत्री म्हणून जी संविधानिक उंची लागते ती…”

मुंबई | राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा मुद्दा उचलून धरत सत्ताधारी आणि विरोधकात चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. हे चित्र असताना अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

अनेक आठवड्यांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Employee Strike) आणि विलीनीकरण्याच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकार व अनिल परब यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अनिल परबांच्या जागी साधा शिवसैनिक बसवा ते या कष्टकऱ्यांसाठी हिताचं ठरेल, अशी मागणी सदावर्ते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.

अनिल परब यांची ताकद तेवढी नसल्याची खोचक टीकाही सदावर्ते यांनी केली आहे. मंत्री म्हणून जी संविधानिक उंची लागते ती अनिल परब यांच्याकडे नाही, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तर हे सर्व अनिल परब यांचा अपमान करण्याच्या दृष्टीने म्हणत नसल्याचंही सदावर्ते यांनी स्पष्ट केलं आहे. (Gunratna Sadavarte Criticises Anil Parab)

दरम्यान, वेतनवाढ आणि एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या प्रमुख मागण्यांसह एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेतनवाढ जाहीर केली. सरकारच्या आश्वासनानंतर अनेक कर्मचारी कामावर परतले. असं असलं तरी अनेक आंदोलक कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असुन आंदोलन करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

Omicron मुळे तिसरी लाट येणार?, आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

चक्रीवादळाचा धोका! ‘या’ तीन राज्यांना अलर्ट जारी, रेल्वे गाड्या देखील रद्द

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच, वाचा आजची आकडेवारी

मुंबई कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

योगी सरकारचा गजब कारभार! उद्घाटनात नारळ फोडायला गेले अन् रस्ताच फुटला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More