बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून मी एक मराठा लाख मराठा घोषणा दिली”, सदावर्तेंचं स्पष्टीकरण

मुंबई | राज्यातील एसटी कर्मचारी  गेल्या काही दिवसांपासून संपावर (ST Employee Strike) असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यातच आता संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने पगारवाढीची घोषणा केली आहे. त्यातच एसटी कामगारांचे वकिल गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांनी सरकारच्या घोषनेनंतर या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर टीकेची झोड उठवली.

एसटी कामगारांच्या लढ्याला यश आल्याचं म्हणून पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा असं म्हणत  त्या दोघांनी मैदान सोडलं. पण जोपर्यंत विलीनीकरणाची मागणी मान्य होणार नाही. तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच यासाठी राज्यातील 250 डेपोचा याला पाठिंबा असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलत असताना मराठा आरक्षणाविरूद्ध खटला (Maratha Reservation) लढवणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेल्या एक मराठा लाख मराठा (Ek Maratha Lakh Maratha) या घोषणेवरून त्यांनी स्पष्टीकऱण दिलं आहे. ‘एक मराठा लाख मराठा ही घोषणा कोणत्याही जातीशी संबंधित घोषणा नसून शक्ती देणारी आणि एकीकरण करणारी घोषणा आहे’, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे (Chatrapati Shivaji Maharaj) आणि भीमसैनिक यांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या चळवळीची ही घोषणा असल्याचंही गुणरत्न सदावर्ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत. तसेच त्यांनी नेमकी एक मराठा लाख मराठा ही घोषणा का दिली हे यातून त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर ‘इरादे नेक हो तो सपने साकार होते है, सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते है’, असं बोलून त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी घोषणाबाजी केली आहे.

थोडक्यात बातम्या

केस कापण्यासाठी गेलेल्या लहान मुलीसोबत धक्कादायक प्रकार; एकाला अटक

भारतातील ‘या’ बड्या कंपनीत मेगाभरती, 1 लाख जागा भरणार

सोन्याच्या भावात काय चाललंय? आज ‘इतक्या’ रुपयांनी महागलं

“बंटी-बबली माझं काहीही वाकडं करु शकत नाहीत”

माणुसकीला काळीमा फासणारी घटना, पोटच्या मुलीवर बापाचे अत्याचार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More