मनोरंजन

अभिनेत्री कंगणा राणावतच्या घराबाहेर गोळीबार; पोलिसांची चौकशी सुरु

शिमला | सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री कंगणा राणावतने बॉलिवूडमधील घराणेशाही व गटबाजीला तीव्र विरोध केला होता. याच कारणाने सध्या ती फार चर्चेत आहे. तर दुसरीकडे कंगणा राणावतच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचं समजतंय. यानंतर आपल्याला घाबरवण्यात येत असल्याचा दावा कंगणाने केलाय.

कंगणा सध्या तिच्या कुल्लूमधील घरी वास्तव्यास आहे. कंगनाच्या सांगण्यानुसार, गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमाराला तिच्या घराबाहेर गोळीबार ऐकू आला. आधी तिला ते फटाके असावेत असं वाटलं. कंगणाने तिच्या सुरक्षा रक्षकाला बोलावलं. त्याला कदाचित गोळीबाराचा आवाज नवीन असेल, म्हणून तो ओळखू शकला नाही.

या घटनेदरम्यान कंगणासोबत घरात कुटुंबातील चार सदस्य उपस्थित होते. या संपूर्ण घटनेची माहिती कंगनाने पोलिसांना दिलीये. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कदाचित कुणीतरी वटवाघुळाला मारण्याचा प्रयत्न करत होतं. वटवाघुळांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होतं. त्यामुळे आम्ही स्थानिक शेतकऱ्याला बोलावलं. मात्र त्याने गोळीबार केला नसल्याचं सांगितलंय.

कंगनाच्या घराच्या आसपास अशा कोणत्याही प्रकारचे पुरावे सापडलेले नाहीत, जे गोळीबार झाल्याची पुष्टी करू शकतील, असं पोलिसांचं म्हणणं आहे. सध्या तिच्या घराशेजारी राहणाऱ्यांकडे चौकशी केली जात असून तिच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

‘पुराव्यांशी छेडछाड होऊ नये, या प्रकरणात लक्ष द्या’; सुशांतच्या बहिणीचं पंतप्रधान मोदींना आवाहन

विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी…., राज्यपालांची महत्त्वाची सूचना

“आमच्या नेत्यांमध्ये दोन काय, चार बायका सांभाळण्याची ताकद”

अण्णाभाऊ साठे यांचं मुंबईत स्मारक उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या