मुंबई | सलमान खानचा बाॅडीगार्ड गुरमीत सिंग उर्फ शेरा राजकारणात सक्रिय झाला आहे. त्याने नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. यापक्षप्रवेशाचे फोटो
शेरा हा सलमान खानचा बॉडीगार्ड असून तो सलमानचा अत्यंत विश्वासू माणसांपैकी एक आहे. शेराने मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आदित्य ठाकरेंनी शेरा यांच्या हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत त्यांचं स्वागत केलं. पक्षप्रवेशानंतर शेरा यांनी शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी आपलं भरीव योगदान योगदान देणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, शेरा यांच्या पक्षप्रवेशानंतर आता शिवसेनेकडून त्याला कुठलं पद देण्यात येतं? हे पाहणं महत्वाचं आहे.
अभिनेते सलमान खान जी यांचे निष्ठावंत व विश्वासू गुरमीत सिंग उर्फ शेरा जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख @AUThackeray यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/UQ2YN4CAnp
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 18, 2019
महत्वाच्या बातम्या-
“पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा उभा करण्याचं राजकारण बंद करा”- https://t.co/3ygp8Tk9IB #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 19, 2019
भरपावसात एकीकडे आजोबांची सभा अन् दुसरीकडे नातवाची! https://t.co/8wAfgMJg9c @RohitPawarSpeak @PawarSpeaks @NCPspeaks #AssemblyElections2019
— थोडक्यात (@thodkyaat) October 19, 2019
अफगाणिस्तानमध्ये मशिदीत भीषण स्फोट, 62 जणांचा मृत्यू- https://t.co/qm6IxWsf2E #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 19, 2019
Comments are closed.