गुरू ग्रहाच्या भ्रमणामुळे ‘या’ 5 राशींचे भाग्य पालटणार!

Astrology

Guru Transit 2025 | 2025 मध्ये देवगुरू बृहस्पतीचा महत्त्वपूर्ण गोचर होणार असून, याचा प्रभाव सर्व राशींवर (Astrology) जाणवणार आहे. 14 मे रोजी रात्री 11:20 वाजता गुरू ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर तो 18 ऑक्टोबरपर्यंत मिथुन राशीत राहिल, त्यानंतर 5 डिसेंबरपर्यंत कर्क राशीत स्थलांतर करेल आणि पुन्हा मिथुन राशीत परत येईल. या वारंवार होणाऱ्या संक्रमणामुळे जगभरात मंदी, आर्थिक गोंधळ आणि बदलाचे वारे वाहतील. मात्र काही राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे.

हिंदू शास्त्रांनुसार, गुरू ग्रह शिक्षण, विवाह, संतान, संपत्ती आणि सौख्यासाठी जबाबदार असतो. त्यामुळे यावेळी 5 विशिष्ट राशींच्या आयुष्यात सुख, समाधान आणि प्रगतीचा नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.

Guru Transit 2025 | या राशींना लाभ होणार :

मेष राशी : गुरूचे तिसऱ्या घरात भ्रमण होत असल्याने मेष राशीच्या जातकांचे आर्थिक स्थितीत मोठे सुधारणा होईल. धर्मकार्यांकडे ओढ वाढेल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी : वृषभ राशीच्या दुसऱ्या घरात गुरूचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे संपत्ती आणि मालमत्तेत वाढ होईल. जुने कौटुंबिक वाद मिटतील. तसेच, आरोग्याशी संबंधित त्रास दूर होण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी : गुरूचे लग्न भावात भ्रमण होत असल्यामुळे मिथुन राशीच्या जातकांचे वैवाहिक जीवन सुधारेल. आर्थिक लाभ होतील, नोकरीत व व्यवसायात प्रगती होईल. संबंधात गोडवा निर्माण होईल.

तूळ राशी : तूळ राशीच्या नवव्या घरात गुरू ग्रहाचा वास होत असल्याने सन्मान, आदर आणि कर्मात वाढ होईल. जीवनातील अडथळे दूर होणार असून नशिबाची साथ मिळेल. आयात-निर्यात व्यवसायात विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी : कुंभ राशीच्या पाचव्या घरात गुरू ग्रहाचे भ्रमण होणार आहे. त्यामुळे संतानप्राप्तीची शक्यता असेल. प्रेमसंबंध मजबूत होतील. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊन आर्थिक स्थैर्य मिळेल.

News Title: Guru Transit 2025: These 5 Zodiac Signs Will Experience Major Luck Changes

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .