बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुटखा तस्करीत सापडला शिवसेना जिल्हाप्रमुख, शिवसेनेनं उचललं मोठं पाऊल

बीड | राज्यात अवैध गुटखा बंदी लागू आहे. तरीही दररोज अनेक प्रकरणं राज्यात उघडं पडतात. राज्यात सध्या शिवसेना सत्तेत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राज्याच्या पालकत्वाची जबाबदारी आहे. परिणामी आपल्याच पक्षातील नेत्याला गुटखा प्रकरणात शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचं नाव समोर आलं आहे.

गुटखा तस्करी प्रकरणी बीड जिल्हाप्रमुख पदावरून कुंडलीक खांडे यांना पक्षानं हटवल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी राजकीय दबाव तंत्राचा वापर करून खांडे यांना संरक्षण मिळणार नाही हे आता उघड झालं आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी बीड पोलिसांच्या एका तुकडीनं गुटखा तस्करी विरोधात मोठी कारवाई केली होती. या कारवाईत त्यांनी खांडे यांच्यावर गुटखा तस्करीत हात असल्याचं स्पष्ट करत गुन्हा दाखल केला होता.

बीड पोलिसांच्या कारवाईनंतर राज्यात एकच खळबळ माजली होती. सत्तेची सुत्र हातात असणाऱ्या शिवसेनेच्याचं पदाधिकाऱ्यानं कृत्य केल्यानं शिवसेनेवर जोरदार टीका झाली होती. शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये खांडे यांच्यावर कारवाई झाल्याचं सांगण्यात आलं आहे. खांडे यांच्या जागी नवीन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती लवकरच करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कुंडलिक खांडे यांच्याविरोधात केज पोलीस स्थानकात अवैध गुटखा तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात खांडे यांच्या या प्रकरणानं खळबळ माजवली आहे. शिवसेनेनं खांडे यांच्यावर कारवाई करून एकप्रकारे चुकीच्या गोष्टींना पक्ष पाठिशी घालणार नाही हा संदेश सर्व पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या 

अखेर काँग्रेसच्या प्रयत्नांना यश, भाजपने निवडणुकीत दिला काँग्रेसला हात

वानखेडे-मलिक वादात आता नवाब मलिकांच्या दोन्ही मुलींची उडी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस

“रझा अकादमी कोणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे”

“महापुरास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप न केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More