Top News महाराष्ट्र मुंबई

सर्वात मोठा निकाल!! गुटखा विक्री करणाऱ्याला आता 10 वर्षे शिक्षा!

मुंबई | राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्रिक्रीला बंदी आहे. मात्र तरीही बेकायदेशीर पद्धतीने गुटख्याची विक्री केली जात आहे. मात्र आता या गुटखा विक्री करणाऱ्यांना आळा बसणार आहे.

गुटखा विक्री करणाऱ्याला 10 वर्षांची शिक्षा आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 188 सोबतच कलम 328 लावता येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

2012 पासून गुटखाजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. मात्र राज्यात सर्रास विक्री सुरु आहे. याबाबत एका एका आरोपीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र राज्यातील मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी तसेच नगर व धुळे जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी विरोध करत उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात रिटा याचिका दाखल केली.

दरम्यान, याचिकेवर  याचिकेवर सुनावणी देत सर्वोच्च न्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीविरोधात कलम 188 व 328 लावणे आवश्यक असल्याचं सांगून उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंड पीठाने दिलेला निर्णय रद्द केला.

 

थोडक्यात बातम्या-

‘शेतकरी आंदोलनामुळे ‘बर्ड फ्लू’ पसरत आहेत’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

50 वर्षीय विधवेवर सामूहिक बलात्कार; नराधमांनी केलेला प्रकार ऐकून काळजाचा थरकाप उडे

‘संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय’; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

“आघाडीमध्ये पहिल्यापासूनच बिघाड आहे, यांनी राज्याला बिघडवू नये”

“सामनात किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहून नाव बदलत नाही त्यासाठी…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या