बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तलफ तलफ तलफ… गुटखा, तंबाखूची पुडी, देशी दारु महागली!

मुंबई | अर्थव्यवस्था डळमळीत होण्यापासून वाचवण्यासाठी श्रेय घेणाऱ्या मद्यप्रेमींना सरकारने पुन्हा लक्ष्य केलं आहे. गेल्या दोन आठवड्यापासून राज्यातील सर्वच ठिकाणी देशी विदेशी दारूची दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे व्यसनींच्या खिशाला पुन्हा एकदा खीळ बसू लागली आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने तंबाखूजन्य पदार्थासोबत दारू विक्रीवर देखील त्यावेळी सुद्धा दुप्पट आणि तिप्पट दराने तलफ भागवण्याची वेळ आली होती. आताही पुन्हा अर्थव्यवस्था वाचवणाऱ्या बहादुरांवर तिच वेळ येताना दिसत आहे.

सध्या राज्यात गुटखा आणि पानमसाल्यांचे उत्पादन आणि विक्रीवर निर्बंध आणले आहेत. तरी देखील शेजारच्या राज्यातून चोर मार्गाने गुटखा आणि तंबाखू राज्यात आणली जात आहे. त्यामुळे  10 रुपयांना मिळणारी तंबाखूची पुडी आता 40 रुपयांना घ्यावी लागत आहे. तर दुसरीकडे गुटख्याच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. आता 100 रुपये देऊन सुद्धा गुटखा लोकांना मिळत नाही.

दारूचे गुत्ते बंद असले तरी अवैध मार्गाने तिप्पट किंमत मोजून देशी दारू घ्यावी लागत आहे. एकीकडे दुकानं बंद असल्यानं साठेबाजीला देखिल जोर आला आहे. त्याचबरोबर अवैध मार्गाने विक्री देखील चालू आहे. तर काही ठिकाणी गुटखा, तंबाखूची पुडी, दारूसाठी ऑनलाईन विक्री चालू आहे.

दरम्यान, पोलीस देखील अशा प्रकारच्या अवैध मार्गांने चालणाऱ्या विक्रीवर नजर ठेऊन आहेत. पुण्यात पोलिसांनी याप्रकरणात धडक कारवाई सुरू केली आहे. तर हडपसर भागात एकाला ऑनलाईन विक्री करताना अटक देखील केली आहे.

थोडक्यात बातम्या-

समय समय की बात हैं, ज्यांना नागपुरातून बाहेर जा सांगितलं, त्यांना परत येण्यासाठी आर्जव!

मी माझं आयुष्य जगलो म्हणत तरुणाला स्वत:चा बेड देणाऱ्या 85 वर्षीय वृद्धाचं निधन

बायकोच्या प्रियकराबद्दल कळल्यानंतर त्याने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

‘मोक्का’ लागलेल्या महिला वकिलाची ससूनच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

कोव्हिड केअर सेंटरमध्ये महिला डाॅक्टरकडे केली शरीरसुखाची मागणी; आरोपीला अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More