भाजप नेत्याकडून राहुल गांधींची तुलना अल्लाउद्दीन खिल्जीशी

राजकोट | भाजप नेते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना अल्लाउद्दीन खिल्जी आणि औरंगाजेबाशी केलीय. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राजकोटमध्ये त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.

औरंगजेबने आपल्या काळ्यात अनेक मंदिरं पाडली. जेव्हा सामान्यांनी त्याला विरोध केला तेव्हा 2-3 मंदिरं बांधून देण्याचं आश्वासन दिलं. अल्लाउद्दीन खिल्जीनंही असंच केलं होतं. राहुल गांधीही आता त्याच दिशेनं जात असल्याची टीका राव यांनी केलीय.

राहुल गांधी याचं मंदिरात जाणंही नाटकीपणा आहे. मंदिरात जाऊन लोकांना भुलवण्याचा प्रयत्न चालू आहे, असंही ते म्हणाले