महाराष्ट्र मुंबई

‘काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत’; या काँग्रेस नेत्याचा राऊतांना इशारा

मुंबई | काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशारा काँग्रेस प्रदेश प्रभारी एच.के.पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना दिला आहे.

एच.के.पाटील यांच्या उपस्थितीत आज मुंबईच्या नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी एच.के.पाटील बोलत होते.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाबाबत विधाने करणारे त्याचा घटकही नाहीत इतक्या महत्वाच्या राजकीय आघाडीच्या कारभारात नाक खुपसणे शहाणपणाचे नाही, असा टोलाही पाटील एच. के पाटील यांनी राऊतांना लगावला.

पक्ष वाढीसाठी मिशन मोडवर काम केलं जाणार असून शंभर दिवसांच्या कार्यक्रमात पदयात्रांच्या माध्यमातून 227 वाँर्डातील कार्यकर्ते आणि तळागाळातील जनतेपर्यंत पोहचणार असल्याचं पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

दिल्लीत बसून शेतीक्षेत्र चालवता येत नाही- शरद पवार

संजय राऊत बिथरले, हादरले आणि घाबरले आहेत- आशिष शेलार

“मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा हे भाजपचे षडयंत्र”

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक; विठोबा भरणे यांचं निधन

“मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या