बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चेहऱ्यावरच्या तेलकटपणासाठी ‘हा’ फेसपॅक अत्यंत गुणकारी

नवी दिल्ली | पावसाळ्यामध्ये काहीसं थंड वातावरण असल्यामुळे महिलांना तसेच तरुणींना चेहऱ्यावर तेल सुटण्याच्या समस्या निर्माण होतात. इतर वेळी देखील अशा काही समस्या त्यांना जाणवतात. या समस्यांवर मेडीकल ट्रिटमेंट करुन देखील उपाय होत नाहीत. अशातच चेहऱ्यावरील तेलकटपणाच्या समस्यांसाठी फेसपॅक लावणं अत्यंत फायदेशीर ठरु शकतं.

चेहऱ्यावरील तेलकटपणासाठी ओट्स आणि टोमॅटोचा फेसपॅक लावावा. यासाठी एका टोमॅटोची बारीक पेस्ट तयार करावी आणि त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बारीक केलेले ओट्स मिश्र करावे. ही पेस्ट संपुर्ण चेहऱ्यावर लावून त्याला वीस मिनिटे ठेवावी. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. हा फेसपॅक आठ दिवसातून किमान तीन दिवस तरी करावा.

तसेच तेलकटपणासाठी काकडी आणि टोमॅटोचा फेसपॅक देखील उपायकारक आहे. एक टोमॅटो आणि दोन काकड्यांची पेस्ट करुन त्यामध्ये मध मिसळावा. त्यानंतर ही पेस्ट 15-20 मिनीटे चेहऱ्यावर लाऊन नंतर कोमट पाण्याने धुवावी. अगदी नैसर्गिकरित्या सांगायचं म्हटलं तर कोरफडीचा गर लावावा. याने चेहऱ्यावरील तेलकटपणा जाण्यास मदत होईल.

दरम्यान, लॅक्टिक अॅसिड, टाॅक्झिन्स आणि छिद्र साफ करण्यासाठी 2 चमचे जाड भरड्या ओट्सच्या पिठामध्ये 2 चमचे टोमॅटोची पेस्ट मिसळावी. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनीटे लावावी. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.

थोडक्यात बातम्या-

“सर्वांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावून द्या, आमचा सीएम जगात भारी”

भारतीय पुरूष हाॅकी संघाचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून भारताचा पराभव

नियतीने घात केला अन् हिमालयाएवढ्या उंचीचा, कैलास भारत पवार गेला…

लाईव्ह सेशनमध्ये अभिनेत्रीला न्यूड पाहून चाहत्यांना बसला धक्का, पाहा व्हिडीओ!

भारताला मिळाला ‘हा’ मोठा मान; पंतप्रधान नरेंद्र मोदी रचणार इतिहास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More