बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यासाठी ‘हा’ देश आला पुढे; बीसीसीआय पुढे नवं आव्हान

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचं नेमकी आयोजन कुठे करायचं याचा संभ्रम कायम आहे. वर्ल्ड कपचं भारतात आयोजन होणार आहे, पण देशातल्या कोरोना संकटामुळे या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आयसीसीने बीसीसीआयला याबाबतचा निर्णय घेण्यासाठी 28 जूनपर्यंतचा कालावधी दिला आहे.

त्यातच आता ओमाननंही टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाची इच्छा बोलून दाखवली आहे. जर संधी मिळाली, तर आम्ही नक्कीच टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करू, त्यासाठी आम्ही तयार आहोत, असं ओमान बोर्डानं सांगितलं आहे.

ओमान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख पंकज खिमजी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं की, ‘या मुद्द्यावर बीसीसीआय आणि आयसीसीने निर्णय घ्यावा. ओमान या स्पर्धेचं संभाव्य स्थळ झालं तर आम्हाला आवडेल, असंही ते यावेळी म्हणाले. वर्ल्ड कपचं आयोजन करण्यासाठी आमच्याकडे साधनं आहेत. आयसीसीनेही इकडे आंतरराष्ट्रीय सामने खेळवायला परवानगी दिली आहे. जर टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये खेळवला गेला, तर टी-20 वर्ल्ड कपच्या क्वालिफायर मॅच ओमानमध्ये खेळवल्या जाऊ शकतात’.

दरम्यान, बीसीसीआयला पुढच्या महिन्यात आयसीसीच्या बैठकीत पूर्ण रणनीती ठरवून यावं लागणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या भारतातल्या आयोजनाबाबत आधीच शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. जर वर्ल्ड कप युएईमध्ये खेळवण्यात आला, तरी त्याच्या आयोजनाचे अधिकार बीसीसीआयकडेच राहतील.

थोडक्यात बातम्या –

राष्ट्राध्यक्षांचं ट्वीट डिलीट करणं ट्विटरला पडलं महागात; झाली ‘ही’ कारवाई

धक्कादायक! कोरोनामुळं आई-वडिलांचं छत्र हरपल्यानं तीन मुलं झाली अनाथ

‘…म्हणून ‘अनलॉक’च्या निर्णयावर गोंधळ झाला’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

कोरोना झालेल्या महिलेच्या हृदयातून काढली चक्क 7 सेंटीमीटरची गाठ

सकारात्मक बातमी! शनिवारी देशात गेल्या काही दिवसांतील सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More