तरुणीचा ‘हा’ पॅराग्लायडिंग व्हिडिओ होतोय खुपचं व्हायरल; विनंती पाहुन हसू आवरणार नाही, पाहा व्हिडिओ
नवी दिल्ली | आजकालच्या तरूणांना पॅराग्लायडिंग, स्कुबा डायव्हिंग असे स्टंट करायला वेगळीच मजा येते. अशाच मजेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एक तरुणी पॅराग्लायडिंग करताना शुट करण्यात आला आहे. तरुणीने पॅराग्लायडिंगच्या सुरूवातीला शुट करायला चालु केला होता. त्यानंतर या व्हिडिओने स्टंट कमी आणि विनोदी वळण जास्त घेतल्याचं पाहायला मिळालं.
व्हायरल व्हिडिओ हा खज्जर येथील असून इनक्रेडिबल हिमालय या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सुरूवातीला तरुणी खुप उत्साही आणि आत्मविश्वासु होती. त्यानंतर भरारी घेताच ती आरडा-ओरडा करू लागते. एवढचं नाही तर ती खाली उतरवण्याची विनंती देखील करते. ह्या तरुणीसोबत एक व्यक्ती सुद्धा आहे, जो तिला पॅराग्लायडिंगसाठी मदत करत आहे. मात्र तिची भिती बघून तो देखील तिची मजा घेऊ लागतो.
पॅराग्लायडिंग दरम्यान मदत करणारा तरूण तिला आजू-बाजूच्या दृश्याचा आनंद घेण्यास सांगत आहे. मात्र घाबरलेली तरूणी डोळे बंद करुन फक्त खाली उतरवण्याची विनंती करत आहे. काही वेळानंतर दोघेही त्यांच्या जागी खाली उतरतात आणि तरूणीची भिती कमी होते. तरी तिचं रडणं काही थांबत नाही.
दरम्यान, हा व्हिडिओ साडे तीन मिनिटांचा असून शेअर करताच या व्हिडिओला हजारो लोकांनी पसंती दर्शवली. तसेच या व्हिडिओवर प्रचंड प्रतिक्रिया देखील येत आहे. काहींनी त्या मुलीने ओव्हर अॅक्टींग केल्याचं म्हटलं आहे तर काहींनी तिच्यावर विनोदी कमेंट्स केल्या आहेत.
पाहा व्हिडिओ –
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
मास्कच्या कारवाईसाठी गाडी थांबवली, तरुणाच्या कृतीनं पोलीसच पळू लागला, पाहा व्हिडीओ
अवघ्या 12 वर्षांच्या बहिणीसोबत सख्या भावाने केलं ‘हे’ दुष्कृत्य; बहीण-भावाच्या नात्याला काळीमा!
मद्यप्राशन केलेल्या तरुणीचा भररस्त्यात राडा; हटकणाऱ्या पोलिसांची धरली काॅलर, पाहा व्हिडीओ
महापौर मुरलीधर मोहोळांनी लागु केले पुण्यात नवे निर्बंध; नागरिकांची साथ कमी पडल्यास लॉकडाऊन होणार!
Comments are closed.