बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खान प्रकरणात हॅकर मनिष भंगाळेचा खळबळजनक दावा; ‘ते’ CDR काढण्यासाठी होती लाखोंची ऑफर

जळगाव | आर्यन खान प्रकरणात एकापाठोपाठ एक खळबळजनक खुलासे होत आहेत. पंच प्रभाकर साईलने केलेल्या धक्कादायक आरोपानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या सर्व प्रकरणात आता जळगावचे हॅकर मनिष भंगाळेंनी उडी घेतली आहे. आर्यन खान प्रकरणातील काही पुरावे टॅम्पर करण्यासाठी त्यांना 5 लाख रूपयांची ऑफर दिली गेली असल्याचा धक्कादायक खुलासा मनिष भंगाळेंनी केला आहे.

अलोक जैन आणि शैलेश चौधरी नामक दोन व्यक्ती 6 ऑक्टोबर रोजी भंगाळेंना भेटण्यासाठी जळगाव येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी आर्यन खान प्रकरणाशी संबंधित तीन कामं करायला सांगितली आणि त्या कामाच्या बदल्यात 5 लाख रुपयांची ऑफर दिली असल्याचा खुलासा भंगाळेंनी केला आहे. त्या व्यक्तींनी भंगाळेंना 3 नंबरचा CDR काढणे, एका व्हाॅट्सअॅप चॅटमध्ये फेरबदल करणे आणि प्रभाकर साईलच्या नावाने सिम कार्ड घ्यायला सांगितलं.

मनिष भंगाळेच्या सांगण्यानुसार, CDR काढण्यासाठी सांगण्यात आलेल्या 3 नंबरमध्ये एक नंबर होता तो शाहरूख खानची मॅनेजर पुजा ददलानीचा तर ज्या व्हॉट्सअॅप चॅट बॅकअपमध्ये बदल करायला सांगितलेला तो फोल्डर आर्यन खान नावाने सेव्ह होता आणि त्या दोन व्यक्तींनी प्रभाकर साईलच्या नावाने डुप्लिकेट सिम कार्ड देखील घ्यायला सांगितलं. यासाठी भंगाळेंना 5 लाखाची ऑफर होती तर त्यातील 10 हजार अॅडव्हान्स म्हणून जबरदस्ती देण्यात आले.

मी या सगळ्या गोष्टी ईतक्या मनावर घेतल्या नाहीत पण जेव्हा टीव्हीवर प्रभाकर साईल नाव पाहिलं तेव्हा कुठेतरी पाणी मुरत असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी नाही तर दुसरं कोणीतरी हे काम करेल म्हणुन मी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून या सगळ्या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली असल्याचं हॅकर मनिष भंगाळे यांनी सांगितलं आहे. भंगाळेंनी काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसेंना दाऊदच्या कराची येथील घरातून फोन आल्याचा दावा केला होता. त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते.

थोडक्यात बातम्या-

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता मुंबई पोलिसांचीही उडी! करणार ‘हा’ तपास

“एका महिलेशी कसं बोलावं हे पवारसाहेबांनी शिकवलं नाही का?”

“पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की मोदींची दाढी एक इंच वाढते”

“…तोपर्यंत ड्रग्स प्रकरणाची चौकशी समीर वानखेडेचं करतील”

“ही निवडणूक केवळ देवेंद्र फडणवीसांचं मुंगेरीलालचं स्वप्न”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More