बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी नसते तर आज भारताची अवस्था अफगाणिस्तानसारखी झाली असती- कंगणा राणावत

नवी दिल्ली | अफगाणिस्तान देशाला तालिबान्यांनी पुर्णपणे ताब्यात घेतलं आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी देश सोडून गेले आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती चिघळली आहे. अफगाणिस्तानमधील नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडून जाताना दिसत आहेत. अशातच नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तान देश तालिबान्यांचं पालनपोषण करतो आणि तर अमेरिका त्यांना शस्त्रं पुरवतो. जर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर भारताचीही अवस्था आजच्या अफगाणिस्तानासारखीच झाली असती, असं कंगणा राणावतने म्हटलं आहे. यासंदर्भात तिने फेसबुक पोस्ट केली आहे.

आज आपण शांतपणे पाहत आहोत, उद्या हे आपल्यासोबतही घडू शकतं. भारत सरकार अफगाणिस्तानमधील भारताच्या लोकांनी परत आणत आहे. चांगलं झाल मी सीएए कायद्याला पाठींबा दिला, असंही कंगणा म्हणाली. कंगणाने व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये, हे चित्र आहे आजचं अफगाणिस्तानमधील राष्ट्राध्यक्षांच्या आलिशान घरातील. फार वर्षांपूर्वी भारतमाता या भटक्या आणि रानटी मुस्लिमांच्या कचाट्यात कशी सापडली असेल, याची कल्पना या व्हिडीओमधून येत असल्याचं कंगणा म्हणाली.

दरम्यान, तालिबानचं अफगाणिस्तानवर एकहाती वर्चस्व राहण्याची चिन्हे दिसत आहेत. तालिबान राजवट पुन्हा येऊ लागल्याने अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी केली होती.

थोडक्यात बातम्या-

मुंबई कोरोनामुक्त होतंय! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लीकवर

‘शहाण्यांना शब्दाचा मार’; 12 आमदारांच्या नियुक्तीपत्रावरून शरद पवारांचा राज्यपालांना टोला

कडक ना भावा! ना रोहित, ना विराटला जे जमलं ते शमीने करून दाखवलं

अफगाणिस्तानच्या तरूण मुलींवर मोठं संकट, ‘या’साठी सुरू आहे जबरदस्ती!

“शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही वाचलं नसेल तेवढं मी 50 वर्षापुर्वी वाचलं आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More