दम असेल तर अटक करुन दाखवा- हाफीज सईद

हाफिज सईद

इस्लामाबाद | दम असेल तर मला अटक करुन दाखवा, अशी धमकी जमात उद दावा संघटनेचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदने पाकिस्तान सरकारला दिलीय. पाकिस्तानमध्ये त्याच्यावर सुरु झालेल्या मुस्कटदाबीमुळे तो अस्वस्थ आहे. 

दहशतवादाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेने पाकिस्तानला धारेवर धरले आहे. भारताकडूनही दबाव तयार करण्यात येतोय. त्यामुळे हाफीजचं रिपोर्टिंग करण्यावर बंदी घालण्यात आलीय. या प्रकारामुळे हाफीजची चलबिचल सुरु झालीय. 

मला दाबण्याचा प्रयत्न केला तर मी पूर्ण ताकदीनिशी उभा राहीन, असं त्यानं म्हटलंय. तसेच माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आमच्या म्हणण्याप्रमाणे काश्मीरचा मुद्दा मांडला तर त्यांना पुन्हा पंतप्रधान होण्यास मदत करु, असंही त्यानं जाहीर केलंय.