हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार; योगी आदित्यनाथांचं आश्वासन

Yogi Adityanath

हैदराबाद | तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोर धरत आहे. अशात हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करण्याचं आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी रविवारी दिलं.

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातल्या शहरांची नावं बदलण्याचा धडका धरला आहे. नुकतंच त्यांनी अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज केलं आहे. तर फैजाबाद जिल्ह्याचं नाव बदलून अयोध्या केलं आहे.

योगी आदित्यनाथ यांच्यावर या मुद्द्यावरुन टीका होत आहे. मात्र त्यांनी आता आंध्र प्रदेशच्या राजधानीचं नाव बदलण्याची घोषणा केली आहे. 

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींनी योगी आदित्यनाथ यांना प्रत्त्युतर दिलं. ज्या दिवशी माझ्या वडिलांनी या देशात जन्म घेतला, त्या दिवसापासून हा देश माझ्या बापाचा झाला, असं ओवैसींनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

-नरेंद्र मोदींना टफ-फाईट; आमदार जितेंद्र आव्हाड बनले चहावाले!

-राज ठाकरेंचा हा व्हीडिओ पाहून तुमची छाती अभिमानानं फुलून येईन!

-राज ठाकरेंनी हिम्मत दाखवली; उत्तर भारतीयांना त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन सुनावलं!

-“…असं वाटतंय या सभागृहात कोणी वाघ आलाय”

-“नेहरू ते मोदी उत्तर प्रदेशातून पंतप्रधान झाले तरी विकास का झाला नाही?”