‘पद्मावत’ सिनेमा पाहात असताना 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार

हैदराबाद | पद्मावत सिनेमा पाहात असताना 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आलाय. फेसबुकवरुन ओळख झालेल्या तिच्याच मित्राने हे कृत्य केल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे. 

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. थिएटर व्यवस्थापनावरही कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, पीडितेची आरोपीशी फेसबुकवरुन ओळख झाली होती. त्यानंतर ते हैदराबाद आणि सिकंदबादमधील हॉटेल आणि पार्कमध्ये भेटले. पद्मावत पाहण्यासाठी गेले असताना आजूबाजूच्या खुर्च्या रिकाम्या असल्याने आरोपीने आपल्यावर जबरदस्ती केली, असं पीडितेचं म्हणणं आहे.