सेल्फी काढण्याच्या नादात ट्रेनची धडक, तरुण थोडक्यात वाचला

हैदराबाद | सेल्फी काढण्याच्या नादात कोण कोणत्या थराला जाईल काही सांगता येत नाही. अशाच प्रकारे धोकादायक पद्धतीने सेल्फी काढणाऱ्या हैदराबादमधील तरुणाचा जीव थोडक्यात वाचलाय. 

रेल्वे ट्रॅकच्या शेजारी उभा राहून हा तरुण सेल्फी काढत होता. ट्रेन जशी जवळ येऊ लागली तसे मोटरमनने हॉर्न वाजवून त्याला बाजूला हटण्याचे संकेत दिले, मात्र त्याऐवजी त्यानं ट्रेनच्या दिशेनेच हात केला. ट्रेनची जोराची धडक बसल्याने हा तरुण जागीच कोसळला.

सुदैवाची गोष्ट म्हणजे इतक्या धोकादायक पद्धतीने अपघात होऊनही किरकोळ जखमी होऊन हा तरुण वाचला. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.