हैदराबादमध्ये डेव्हिड वॉर्नर नावाचं वादळ, कोलकात्याचा पराभव

हैदराबाद | कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या शतकामुळे हैदराबादने बलाढ्य कोलकात्याला पराभूत करण्याचा पराक्रम केला. डेव्हि़ड वॉर्नरने 59 चेंडूत 127 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने कोलकात्यापुढे विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होतं. 

विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरलेल्या कोलकात्याला हे आव्हान पेलवलं नाही. 20 षटकात 7 गडी गमावून त्यांना 161 धावाच करता आल्या.