‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ’31ऑगस्टपर्यंत करा अर्ज

Job Update l हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने IIT उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात.

पात्रता आणि निकष काय आहे? :

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम उमेदवारांना www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर, उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेला QR कोड भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, अर्ज भरताना योग्य माहिती भरावी आणि कोणत्याही प्रकारची चूक करू नये, फॉर्ममध्ये चूक असल्यास त्यांना ती दुरुस्त करण्याची संधी दिली जाणार नाही.

ITI पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून दोन वर्षांचे किंवा एक वर्षाचे ITI प्रमाणपत्र घेतलेले असावे. इतर कोणत्याही कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून नोंदणी केलेले किंवा शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

Job Update l किती पदे भरली जाणार? :

या भरतीद्वारे ITI शिकाऊ उमेदवाराचे एकूण 324 पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये, उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शॉर्टलिस्ट करून निवडले जाणार आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीसाठी HAL नाशिकमध्ये सामील व्हावे लागेल.

इच्छुक उमेदवार www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

News Title- HAL Recruitment 2024

महत्वाच्या बातम्या-

SBI ने करोडो ग्राहकांना दिला झटका, MCLR वाढवला, EMI एवढ्याने वाढणार

सुप्रिया सुळेंच्या भाषणावेळी गोंधळ, मराठा आंदोलक आले, अन्…, नेमकं काय घडलं?

उन्हाचे चटके वाढले! राज्यात पाऊस पुन्हा कधी परतणार?, IMD कडून महत्वाची अपडेट

वातावरण तापलं! पुण्यात घडली धक्कादायक घटना

स्वातंत्र्यदिनी ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट पाहून आजचा खास दिवस करा साजरा!