नागपूर महाराष्ट्र

आता लग्न आणखी ‘मंगल’ होणार, राज्य सरकारकडून या गोष्टीला परवानगी

नागपूर |  राज्याला कोरोनाचा विळखा असताना लग्न समारंभासाठी ५० जणांच्या उपस्थितीची परवानगी याआधीच देण्यात आली आहे. मात्र आता लग्न समारंभाचे आयोजन मंगल कार्यालयात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाकडून यासाठी नुकतीच परवानगी मिळाली आहे.

५० जणांच्या उपस्थितीत लग्न करण्याची मुभा शासनाकडून मिळाली असली तरी, मंगल कार्यालय बंद असल्यानं लग्नसोहळा कसा पार पाडायचा याबाबत संभ्रम कायम होता. अखेरीस जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंगल कार्यालय खुली करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. काही नियमांच्या अटी घालत प्रशासनानं ही मागणी मान्य केली आहे.

लग्न सोहळ्यासाठी मंगल कार्यालय खुली करण्यात आली असली तरी लग्नासाठी रीतसर परवानगी मात्र घ्यावी लागणार आहे. कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व नियमांचं पालन करणंही बंधनकारक असणार आहे.

लाॅन, वातानुकूलित मंगल कार्यालय, सभागृह किंवा घराच्या परिसरात सुरक्षित अंतर पाळून लग्न सोहळा करण्याची मुभा देण्यात आली आहे. असं सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

तुकाराम मुंढेंच्या आयुष्यात पहिल्यांदाच गैरव्यवहाराचा आरोप, महापौरांनी उचललं मोठं पाऊल!

सुशांतच्या दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शब्द

महत्वाच्या बातम्या-

ऑनलाईन वर्ग कसे सुरू आहेत, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी तसंच विद्यार्थ्यांशी संवाद

भारत-चीन संघर्ष, राजनाथ सिंग यांनी रशियाकडे केली ही महत्त्वाची मागणी

“भारतीय सैनिकांचं रक्त सांडताच शिवरायांच्या महाराष्ट्राने चीन्यांसोबतचे करार रद्द केले तसं….?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या