Top News महाराष्ट्र मुंबई

“लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही, सुरक्षेची खरी गरज महिलांसह संपूर्ण जनतेला”

मुंबई | लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही. राज्य सरकारने हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षा कवच आहेत. त्यामुळे आमची काळजी न करता राज्यातील सुव्यवस्था नीट रहावी याकडे राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

पत्रकार आणि राज्य सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबल्यामुळे न्यायालयाकडून सतत सरकारवर वाभाडे निघत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिसांची उर्जा वाया न घालवता ती इतर ठिकाणी वापरण्यात यावी, अशी अपेक्षा आहे, असं म्हणत पाटलांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.

दरम्यान, मला सुरक्षेची गरज नाही मी फिरत राहणार असल्याचं विरोधी पक्षनेते पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार- देवेंद्र फडणवीस

“महाविकास आघाडी सरकारला देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता खुपत आहे”

नाशिकमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश

भाजपच्या माजी आमदाराने काढली विद्यार्थिनीची छेड, जमावाने दिला चोप; पाहा व्हिडीओ

‘…तर भाजपच्या विधानसभेला 175 जागा निवडून आल्या असत्या’; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या