बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आत्मनिर्भर पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल- चंद्रकांत पाटील

मुंबई |  देशाची अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी 20 लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केली आहे. आर्थिक सुधारण वेगाने लागू करण्यात येतील आणि लॉकडाऊनचं चौथं स्वरूप अगदी नवीन असेल, असं मोदींनी काल देशवासियांना केलेल्या संबोधनात सांगितलं. या आर्थिक पॅकेजचं महाराष्ट्र  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजने देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढून विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के एवढे मोठे ऐतिहासिक पॅकेज जाहीर केले आहे.

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजचा लाभ देशातील सर्व घटकांना मिळेल आणि शेतकरी, शेतमजूर, कामगार, मध्यमवर्गीय, लघु उद्योजक अशा सर्वांच्या सहभागाने देश महासत्ता होईल, असंही पाटील म्हणाले.

दुसरीकडे मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजवरून काँग्रेस नेत्यांमध्ये संभ्रम असल्याचं दिसून येत आहे. काही काँग्रेस नेत्यांनी पॅकेजचं स्वागत केलं आहे तर काँग्रेस नेत्यांनी मात्र पॅकेजवर टीका केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

लाॅकडाऊन 4ची घोषणा कधी होणार?, नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

महत्वाच्या बातम्या-

…तर 105 आमदारांचे 50 व्हायला वेळ लागणार नाही; एकनाथ खडसेंचा पक्षनेतृत्वाला इशारा

बहुजन नेतृच्व खच्ची करण्याचा प्रयत्न, भाजपात लोकशाही राहिली नाही- एकनाथ खडसे

पंतप्रधानांना जर ठोस काही सांगायचं नसेल तर गोंधळाचं वातावरण कशाला निर्माण करता?; आंबेडकरांची टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More