Top News महाराष्ट्र मुंबई

लटकवणे, भटकवणे आणि अडकवणे असा ठाकरे सरकारचा कारभार- अशिष शेलार

मुंबई |  मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे. त्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे असा ठाकरे सरकारचा कारभार असल्याचा घणाघात भाजप आमदार आशिष शेलारांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. आज ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत. त्यावेळेलासुद्धा सांगताना आम्ही म्हटले होते. मीठागर आयुक्त सॉल्ट कमिश्नरची परवानगी जागा नावावर करताना घेतली होती का?, असा सवालही आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे.

मेट्रोच्या कारशेडवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“4 हजार कोटी बरबाद करण्याचा शौक असेल तर मंत्र्यांनी स्वत:च्या खिशातले उडवावे”

“…तर भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”

…हे तर महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र- किशोरी पेडणेकर

भयंकर महागाई ही भाजपकडून जनतेला दिवाळीची भेट- प्रियांका गांधी

‘राज्यात हजारो रोजगार उपलब्ध होणार’; ठाकरे सरकारचा 15 कंपन्यांसोबत सामंजस्य करार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या