पुणे महाराष्ट्र

शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी

पुणे | राजकारणात फारच कमी वेळा सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळत असते, मात्र शिरुर तालुक्यातील करंदी गावचे शंकर जांभळकर याला अपवाद ठरले आहे. राष्ट्रवादीचं बहुमत असलेल्या शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसने त्यांना संधी दिली आहे.

शंकर जांभळकर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडील करंदी ग्रामपंचायतमध्ये लिपीक म्हणून कामाला होते. उच्चशिक्षित शंकर जांभळकर यांचा स्वत:चा व्यवसाय असून सुशिक्षित तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे म्हणून त्यांनी राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली. गांधीवादी विचारांवर श्रद्धा असलेल्या जांभळकरांनी आपल्या राजकीय वाटचालीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसची निवड केली.

या निवडीनंतर आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नूतन सभापती जांभळकर यांचा फेटा बांधून व हार घालून सत्कार करण्यात आला. सर्व संचालक यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या ताब्यातील बाजार समितीचा गेल्या तीन वर्षातील कारभार खूप चांगला आणि वेगवान झाला असून, शेतकरी विकासाची हीच परंपरा सर्व संचालकांना विश्वासात घेऊन अधिक वेगाने राबवून कारभाराचा नवा आदर्श निर्माण केला जाईल, अशी प्रतिक्रिया जांभळकरांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाच्या संकटात सामान्य माणसाला इंधन दरवाढीचा शॉक नको- मायावती

विरोधकांनी लक्षात ठेवावं, आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच- बाळासाहेब थोरात

महत्वाच्या बातम्या-

“पेंग्विनच्या अंड्यातून बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई?”

महाराष्ट्रातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवला

…तेव्हा गप्प का?, पडळकरांवरुन राष्ट्रवादी राजकारण करत आहे- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या