Top News

छत्रपती शिवरायांनंतरचा दुसरा जाणता राजा नरेंद्र मोदीच- हंसराज अहिर

वर्धा |  महाराष्ट्रात शरद पवार यांचे नाव जाणता राजा म्हणून अनेक वर्ष गाजले. मात्र त्यांनी कुटुंब मोठं करण्यापलिकडे काही काम केलं नाही. पण त्यानंतर देशाचा आणि महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास पंतप्रधान मोदींनी केला. छत्रपती शिवरायांनंतर खरा जाणता राजा कोणी असेल तर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी, असं वक्तव्य माजी भाजप खासदार हंसराज अहिर यांनी केलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी देशाची गरज काय ओळखून त्यांनी देशाच्या विकासाची कामं हाती घेतली. जाणता राजा हा शब्द सर्वांना लागू होत नाही, खरे जाणते राजे आमचे नेते मंडळी आहेत, असं अहिर म्हणाले.

देशाच्या सीमा सुरक्षित करण्यापासून ते कृषीप्रधान देश करण्यापर्यंत मोदींनी कामं केली. लोकसंख्या पाहून मोदींनी कामं हाती घेतली, म्हणून देशाचा खरा जाणता राजा कोणी असेल छत्रपती शिवरायांनंतर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी, अशी पुष्टी त्यांनी पुढे जोडली.

राष्ट्रवादीतील मंडळी मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये येत आहे. कोण कोणाला सोडत आहे याला महत्व नाही. येणारे मोदींची कार्यशैली पाहून भाजपमध्ये येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या